SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

schedule07 Jul 26 person by visibility 314 categoryराज्य

कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे संशोधक प्रा महेश वासुदेव गावडे यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रायसिंग इन ई-कॉमर्स विथ रिस्पेक्ट टू मार्केट ट्रेण्ड्स'  या विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण केले असून विद्यापिठाकडून त्याना  पीएच.डी. ही पदवी जाहीर झाली आहे.

या संशोधनात ई-कॉमर्स क्षेत्रातील किंमत निर्धारण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रांचा वापर करून बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करण्यात आला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापिठाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले. 

कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,  प्र-कुलपती ऋतुराज पाटील,  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील,  टेक्निकल कॅम्पसचे  डायरेक्टर डॉ. एस आर पावसकर यांचे मार्गदर्शन  व सहकार्य लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes