SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के भाविक, पर्यटक, महिलांसाठी खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे रविवार होणार लोकार्पणपन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवालगोकुळच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात चुकीचा संदेश पसरविणाऱ्या निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कडक कारवाई करामानवतेचा आधारस्तंभ: जागतिक रेड क्रॉस दिवसडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणारविद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलकृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जाहिरात

 

पन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

schedule08 May 26 person by visibility 128 categoryराज्य

कोल्हापूर : पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) समोरील तलावा शेजारी असलेले बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले आहे. सादोबा दर्गा ट्रस्टींनी येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढून न घेतल्यास 9 मे रोजी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण केलेले बांधकाम निष्कासीत करण्याचे ठरले आहे. अतिक्रमण निष्कासन कारवाई दरम्यान मुस्लीम धर्मीयांकडून एकत्र येवून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अतिक्रमण कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पन्हाळगड येथे येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत पन्हाळगड व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार 8 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 10 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांनी एकत्र येऊ नये तसेच रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes