SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षाकोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंदआंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन: पर्वतांच्या भूताचे अस्तित्व आणि संवर्धनाचा लढाजलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शने

schedule23 Oct 26 person by visibility 175 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेत 'केंद्रीय किचन पद्धत' लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने (सिटू संलग्न) दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील गरीब महिलांना बेरोजगार करणारी ही पद्धत सुरू करू दिली जाणार नाही, असा ठाम पवित्रा संघटनेने घेतला आहे.

सन २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमधील कुपोषण रोखणे आणि शाळांमधील गळती थांबवण्यासाठी ही पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे विधवा, परित्यक्ता, अविवाहित, गरीब, दलित आणि अल्पसंख्याक महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळाला असून सध्या महिला बचत गट व महिलांमार्फत ही योजना राबवली जात आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक महिला मदतनीस व स्वयंपाकी म्हणून मागील २३ वर्षांपासून कार्यरत आहेत. केवळ २५०० रुपयांच्या अल्प मानधनावर या महिला शाळांमध्ये मुलांना ताजे आणि गरम अन्न शिजवून देण्याचे काम करत आहेत.

मात्र, ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत शासनाने पुन्हा एकदा केंद्रीय किचन पद्धत आणण्याचा विचार सुरू केला आहे. अक्षय पात्रा, वेदान्ता, इस्कॉन यांसारख्या कॉर्पोरेट कंपन्यांना या योजनेचा मक्ता देण्याचा घाट घातला जात असून देवाच्या नावावर नफा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापूर्वी आदिवासी भागांत केंद्रीय किचनविरोधात विद्यार्थी व पालकांनी आंदोलने केली असून न्यायालयांनीही अनेकदा ही पद्धत फेटाळून मदतनीस व स्वयंपाकी महिलांचे संरक्षण केले आहे.
शाळेत अन्न शिजवण्याऐवजी 'अन्न कारखाना' किंवा 'फूड फॅक्टरी' सुरू करून कष्टकरी महिलांना कामावरून हटवण्याच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात येणार आहे. 

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, सचिव कॉ. विवेकानंद गोडसे, शिरोळ अध्यक्षा सुनिता मल्लिकवाडे, कागल अध्यक्ष रामचंद्र दंडवते आणि हातकणंगलेचे राजकुमार बुकटे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes