SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षाकोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंदआंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन: पर्वतांच्या भूताचे अस्तित्व आणि संवर्धनाचा लढाजलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरु

जाहिरात

 

कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’

schedule23 Oct 26 person by visibility 129 categoryसामाजिक

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणावर आधारित ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन सायबर महाविद्यालयाच्या राधाबाई शिंदे सभागृहात करण्यात आले आहे. हा महोत्सव मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर व बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे.

​महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापुरातील उद्योजिका श्रीमती मोनिका मोहिते, ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’ कंपनीचे साईट लीडर श्री. सुरेश मगदूम, किर्लोस्करचे एचआर प्रमुख हरीश सायवे आणि सायबरचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

​या दोन दिवसीय महोत्सवात पर्यावरणावर आधारित विविध लघुपटांचे सादरीकरण करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. शिंपा शर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार असून, तेजस झगडे, चिदंबर शिंदे व सागर चौगुले यांचे पर्यावरणीय प्रात्यक्षिक सादरीकरण होणार आहे.

​माण तालुक्यातील रोहित बनसोडे, रक्षिता बनसोडे आणि योगेश फोंडे यांचा त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश शर्मा यांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.

​महोत्सवाच्या आयोजनाबाबतची सविस्तर माहिती किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी उपक्रम अधिकारी शरद आजगेकर, लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई, तसेच सायबर संस्थेचे प्रा. डॉ. दीपक भोसले आणि प्रा. डॉ. पूजा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes