पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 8 सप्टेंबर रोजी बैठक
schedule02 Sep 25 person by visibility 275 categoryराज्य

कोल्हापूर :पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक माहे सप्टेंबर-२०२५ या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ८ सप्टेंबर २०२५ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, विधानभवन येथे आयोजित केली असल्याची माहिती पुणे अपर आयुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित केली जाते. तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते.
ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.