डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्युएस आय-गेज ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस’ पुरस्कार
schedule02 Jan 26 person by visibility 82 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्युएस आय-गेज या शिक्षण गुणवत्ता मूल्यमापन करणाऱ्या संस्थेतर्फे ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व माजी विद्यार्थी अशा सर्व घटकांचा समावेश असलेल्या हॅपिनेस सर्वेक्षणाच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. देशभरातील ७८५ शैक्षणिक संस्थांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ ८० संस्थांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून फक्त दोन संस्थांना हा मान मिळाला आहे. त्यामध्ये डी. वाय. पाटील कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. क्यूएस आय गेजचे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व कार्यकारी संचालक (आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका)डॉ. आश्विन फर्नांडीस यांच्याहस्ते महाविद्यालयाच्यावतीने डीन (क्वालिटी ॲश्युरन्स) डॉ. संतोष भोपळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्काराबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.





