SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूएक थरार....बालंबाल बचावलो.. .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कारकोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीने “वेल्थ कॉन” चे आयोजनसरकारी नोकरीच्या आमिषाने आणखी एक फसवणूक; मुख्यमंत्र्यांनी SIT नेमावी - 'आप'ची आक्रमक मागणी

जाहिरात

 

राधानगरी भरले 97.98 टक्के; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली

schedule29 Jul 26 person by visibility 340 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.19 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ, कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव व कोडोली, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व गारगोटी, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव व तुळशी नदीवरील- बीड असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.19 (97.98 टक्के), तुळशी 2.77 (79.91 टक्के), वारणा 29.28 (85.13 टक्के), दूधगंगा 15.45 (60.84टक्के), कासारी 2.33 (83.97 टक्के), कडवी 2.35 (93.26 टक्के), कुंभी 2.10 (77.26 टक्के), पाटगाव 2.50 (67.17 टक्के), चिकोत्रा 0.81 (53.39 टक्के), चित्री 1.87 (98.91 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.11 (89.15 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (33.57 टक्के) व कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.2, सुर्वे 30.4, रुई 59.10, इचलकरंजी 56.1, तेरवाड 50, शिरोळ 40.8, नृसिंहवाडी 38.3 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 18.5 फूट इतकी पाणीपातळी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes