SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयशगोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीगौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीमदृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश

schedule16 Sep 26 person by visibility 113 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. राधिका क्षत्रिय  हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकविले.

या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध जिल्ह्यातील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये राधिकाने सातत्यपूर्ण सराव,आत्मविश्वास आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदाला गवसणी घातली.

राधिकाच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, डीन (आर अँड डी) डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन  स्टुडंट  अफेअर्स डॉ.राहुल पाटील, प्रा.नीलिमा व्हटकर, विभागप्रमुख डॉ. मनिषा भानुसे यानी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes