SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सायबर महाविद्यालयात वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन : खेळांमुळे घडते सक्षम राष्ट्र भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रमवाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईबिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाईडीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अ‍ॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवडकाळम्मावाडी सबस्टेशनवरील महावितरणच्या कामामुळे 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबानेरंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्तावडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका 2026’ आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय

जाहिरात

 

सायबर महाविद्यालयात वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा उत्साहात

schedule29 Aug 26 person by visibility 67 categoryसामाजिक

कोल्हापूर  : सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत गेली पंधरा वर्षे वारांगणासोबत राखी पौर्णिमा साजरी केली जात असून यावर्षी देखील या संघटनेच्या सदस्यांसोबत राखी पौर्णिमेचा आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना कार्यक्रमाचे आयोजक. प्रा.डॉ दीपक भोसले यांनी प्रास्ताविकात वारांगगणा सखी संघटने सोबतची राखी पौर्णिमा आयुष्याला प्रेरणा देऊन जात असल्याचे सांगितले तर वारांगना सखी संघटनेची अध्यक्षा श्रीमती शारदाताई यादव यांनी वारांगना सखी संघटनेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर सांगून या संघटनेसमोर असणारी आव्हाने व सामाजिक दृष्टिकोन यावर विवेचन करून समाजाने या घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्याचे आवाहन केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना समाजकार्य विभागाचे प्राचार्य डॉ. टी.व्ही. जी. शर्मा यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मोरे यांनी तर आभार  जयश्री कुरबेटी यांनी तर स्वागत गीत शिवानी  शिंदे यांनी सादर केले कार्यक्रमास सायबर चे प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे ,डॉ. सुरेश आपटे,प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. संध्या तळेकर, प्रा. शिवानी गावडे, प्रा. वसीम सय्यद, किर्लोस्कर कंपनीचे मोहन तायडे, व उपस्थित होते. कार्यक्रमास समाजकार्य विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes