SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांचा आढावासरकारला आरसा दाखवणे म्हणजे 'महाराष्ट्रद्रोह' नव्हे; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघाती हल्ला!योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंदशहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकमराजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड; सर्वोच्च पॅकेज ₹२७.५० लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठामातृ सुरक्षा दिन: मातृत्व जपण्याचा संकल्प

जाहिरात

 

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे 'महाराष्ट्रद्रोह' नव्हे; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघाती हल्ला!

schedule10 Jul 26 person by visibility 123 categoryराज्य

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, पोलीस यंत्रणेतील रिक्त पदे, दोषसिद्धीचा घटता दर आणि विविध विकास प्रकल्पांमधील पारदर्शकतेच्या अभावावर सरकारला धारेवर धरले.

आ. पाटील यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या आकडेवारीचा दाखला देत महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांचे वाढते जाळे, बेपत्ता महिला, अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचार तसेच वाढते सांप्रदायिक गुन्हे याबाबत सरकारच्या अपयशावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पोलीस दलातील हजारो रिक्त पदे, अपुरी फॉरेन्सिक यंत्रणा आणि गंभीर गुन्ह्यांमधील घटता दोषसिद्धी दर यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्याची टीकाही त्यांनी केली.

विविध चर्चित गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकांचे (SIT) अहवाल अद्याप सार्वजनिक झाले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने चौकशी अहवाल पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी या प्रकल्पाचा सविस्तर DPR, तांत्रिक अहवाल आणि इतर कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच मुंबई पूरनियंत्रणासाठी प्रस्तावित ₹१३ हजार कोटींच्या प्रकल्पावर सार्वजनिक चर्चा घेऊन निधीचा वापर पारदर्शकपणे व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर भाष्य करत आ. सतेज पाटील म्हणाले, "सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. विरोधी पक्षाचे कर्तव्य म्हणजे सरकारच्या चुका दाखवून देणे आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे." लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणे हा विरोधी पक्षाचा घटनात्मक अधिकार असून सरकारने टीका स्वीकारून त्यातून सुधारणा कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी, महाराष्ट्राला भयमुक्त आणि सुरक्षित राज्य बनवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे, पोलीस यंत्रणा सक्षम करणे, दोषसिद्धीचा दर वाढवणे आणि प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे ही काळाची गरज असल्याचे आ. सतेज पाटील यांनी अधोरेखित केले.


1. मिसिंग लिंक प्रकल्पावर सवाल
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा खर्च ₹४,७०० कोटींवरून ₹७,१८० कोटींपर्यंत वाढल्याबद्दल आ. सतेज पाटील यांनी सरकारला जाब विचारला. प्रकल्पाचा DPR, तांत्रिक अहवाल आणि पर्यावरणीय मंजुरीची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करत, प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी आणि वाढलेल्या खर्चाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

2. "सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही"
लोकशाहीमध्ये सरकारच्या चुका दाखवणे हे विरोधी पक्षाचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे सांगत आ. सतेज पाटील म्हणाले, "सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही." सरकारवर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती चुकीची असून, सरकारने विधायक टीका स्वीकारून त्यातून सुधारणा कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

3. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वाढत्या दहशतीवर चिंता
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा महाराष्ट्रातील वाढता प्रभाव ही गंभीर बाब असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले. आमदार, उद्योगपती आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना धमक्या मिळत असताना सरकारने कठोर कारवाई करण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली. राजकीय संरक्षणामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून राज्यात कायद्याचा धाक कमी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes