स्कूल बस, स्कूल व्हॅन म्हणून 'या' आसन क्षमतेची वाहने वापरता येणार
schedule02 Sep 25 person by visibility 210 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम 2011 मध्ये सुधारणा करुन स्कूल बस व स्कूल व्हॅन यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे.
त्यानुसार आसन क्षमता 13+1 पेक्षा अधिक असलेले वाहने स्कूल बस म्हणून व आसन क्षमता 12+1 पर्यंतची वाहने स्कूल व्हॅन म्हणून केंद्रिय मोटार वाहन नियम-1989 च्या नियम 126 नुसार शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी सुरक्षे संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाव्दारे वेळोवेळी जारी करणाऱ्या आदेशांची पुर्तता करणारे वाहन स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येतील,
अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिली आहे.