अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदक
schedule28 Jan 26 person by visibility 89 categoryक्रीडा
कोल्हापूर : पंजाब युनिव्हर्सिटी, चंदिगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा वेटलिफ्टिंग खेळाडू यश खंडागळे यांनी 71 किलो वजनी गटात स्नॅच 134 व क्लीन अँड जर्क 160 असे एकूण 294 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. तसेच, महिलांच्या 58 किलो वजनी गटात निकिता कमलाकर हिने एकूण 181 किलो वजन उचलून सहावा क्रमांक मिळवला. या दोघांची निवड खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठी झाली.
संघ व्यवस्थापक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र चव्हाण व प्रशिक्षक म्हणून शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंचे शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.