SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

मुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!

schedule30 Jul 26 person by visibility 760 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुली असलेल्या महिलांचे बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांच्या कदमवाडी रोडवरील 'प्रतिमा हॉस्पिटल'वर करवीर पोलिसांनी मोठी धाड टाकून कारवाई केली आहे! या धडाकेबाज कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


 ◼️अवैध रॅकेटचा पर्दाफाश: २६ जुलै २०२६ रोजी करवीर पोलिसांनी कळंबा येथील श्री स्टार लॉजवर कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपी स्वप्निल केरबा पाटील याला बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करताना रंगेहात पकडले होते.

◼️ पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट: या गुन्ह्यातील आरोपी अश्विनी गजानन शिंदे हिची चौकशी केली असता, बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याच्यामार्फत तपासणी करून घेतल्यानंतर, ज्या महिलांना मुली आहेत अशांचे गर्भपात 'प्रतिमा हॉस्पिटल, भिमनगर हाऊसिंग सोसायटी, कदमवाडी रोड, कोल्हापूर' येथे डॉ. चंद्रकांत गायकवाड करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

◼️डमी पेशंट पाठवून रचला सापळा:
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी करवीर पोलिसांनी प्रतिमा हॉस्पिटलमध्ये एक डमी पेशंट पाठवली. या बोगस रुग्णाचा कोणताही केसपेपर न करता तिला थेट हॉस्पिटलमध्ये एडमिट करून घेण्यात आले. डॉ. गायकवाड याने स्वतःकडील पोर्टेबल मशीनमध्ये तिच्या गर्भाची तपासणी करून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी धाड टाकून हा प्रकार रंगेहात उघड केला!

◼️पोलिसांच्या कारवाईत जप्त साहित्य व खळबळजनक खुलासे:
◼️ कोट्यवधींचे बिंग फुटले: पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, गर्भपाताची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे जप्त केली आहेत.

◼️ पाचशेवर संसार उद्धवस्त? प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी डॉ. गायकवाड याने तब्बल २०० ते २५० गर्भपात केल्याची कबुली दिली आहे!

 ◼️सरकारी पदांचा गैरवापर: आरोपीने यापूर्वी गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले (जि. कोल्हापूर) तसेच पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे सिव्हील सर्जन, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक आणि पुणे येथे सहसंचालक म्हणूनही काम केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अटक करण्याची कारवाई सुरू असताना प्रकृती बिघडल्याने आरोपी डॉक्टर सध्या सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे आंतररुग्ण म्हणून दाखल आहे. पोलीस या संपूर्ण रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कसून तपास करत आहेत.

ही कारवाई कोल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक अण्णसाहेब जाधव , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, आप्पासो पवार , यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पोसई कळकुटे, पोसई सुहास पवार, सहा फौजदार राहुल देसाई, पो. हे कॉ. विजय तळसकर, रणजीत पाटील, बजरंग लाड, पो कॉ अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांचे समवेत केलेली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी यांना न्यायालयात हजर करुन पोलस कोठडी रिमांड मंजुर करुन घेत आहोत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes