SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ : मंत्री अतुल सावेचंदगड तालुक्यात खळबळ: पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सांगाडा शेतात आढळलाकोल्हापूरची हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : आमदार राजेश क्षीरसागरनळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरपरमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो : मंत्री हसन मुश्रीफ युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेटकळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभइंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट; दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा उत्साहात जागतिक कुटुंब दिन: नात्यांचा ओलावा आणि समृद्धीचा पाया

जाहिरात

 

चंदगड तालुक्यात खळबळ: पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सांगाडा शेतात आढळला

schedule15 May 26 person by visibility 97 categoryगुन्हे

कोल्हापूर  : चंदगड तालुक्यातील उमगाव पैकी माळीवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या ७९ वर्षीय वृद्धाचा सांगाडा गुरुवारी स्थानिक शिवारात आढळून आला. धोंडीबा विठोबा सावंत असे या मृत वृद्धाचे नाव असून, ते माळीवाडी गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीबा सावंत हे ११ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास शेताकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते परतलेच नाहीत. याप्रकरणी मनोहर धोंडीबा सावंत यांनी चंदगड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते, मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.

पाच महिन्यानंतर, गुरुवारी १४ तारखेला माळीवाडी येथील शेंडा टेक नावाच्या शेतात मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासणीअंती हा सांगाडा बेपत्ता धोंडीबा सावंत यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची रीतसर माहिती विक्रम विठोबा सावंत यांनी चंदगड पोलिसांना दिली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. बी. नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे अंत झाल्याने माळीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes