तिबेट-नेपाळला भूकंपाचा जोरदार धक्का, बिहारमध्येही जाणवले धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.1
schedule07 Jan 25 person by visibility 226 categoryविदेश
नवी दिल्ली : तिबेट आणि नेपाळमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दोन्ही देशांच्या सीमेला लागून असलेल्या भागात सकाळी 6.35 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली. भारतातील अनेक राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याचा सर्वाधिक फटका बिहारला बसला. याशिवाय आसाम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले.
भूकंपाचे केंद्र लोबुचेच्या 93 किमी ईशान्येकडे होते. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच २१ डिसेंबरला नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली होती.