विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासावर अभ्यास करावा : डॉ विजय कुंभार
schedule28 Feb 26 person by visibility 143 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आज मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर व भाई माधवराव बागल प्रशाला कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. डॉ. सी व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रमध्ये लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठाचे डॉ विजय कुंभार (सीनियर रीसर्च असोसिएट) , केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, मुख्याध्यापिका पद्मिनी माने ,उत्तम कुंभार, निलेश पिसाळ,तसेच
प्रभागाचे
नगरसेवक सचिन चौगले, विनायक कारंडे,नगरसेविका पुष्पा नरुटे, रुपाली पोवार यांच्या हस्ते विज्ञान जत्रा प्रदर्शन चे उद्घाटन करण्यात आले .त्यांनी
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयोगांची केलेली मांडणी व सादरीकरण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी विज्ञान जत्रा प्रत्येक महिन्याला सादर करावी असे मत ज्येष्ठ युवा संशोधक डॉ विजय कुंभार यांनी केले.
शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी यावेळी एकविसाव्या शतकात व जगात विद्यार्थी वावरत आहे त्याला प्रत्येक क्षण हा ज्ञानाचा कण आहे असे समजून त्यांनी ज्ञान घेतले पाहिजे एखादी घटना घडते त्या विज्ञान मागील कार्य कारण भाव समजून घेतला पाहिजे. चिकिस्तक व संशोधक वृत्ती ठेवली तरच तो एकविसाव्या शतकातील सामोरे जाण्यासाठी समस्यांना मात करणार आहे. सध्या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रदूषण लोकसंख्या, प्रदूषण,अज्ञान, दारिद्र्य, निरक्षरता, बेरोजगारी असे समस्या भेडसावत आहेत .त्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास करण्याकडे वास्तव जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल व प्रसारमाध्यमांच्या आहारी न लागता सखोल अभ्यास करून पुस्तक वाचन केले पाहिजेत आणि त्या पुस्तकांमधून खऱ्या ज्ञानातून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात योग्य दिशा कोणती हे ठरवलं पाहिजे तरच तो या धावत्या युगात विज्ञान युगात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना हवा असलेला स्वप्नातील भारत सत्यात उतरण्याचं काम तो विद्यार्थी सक्षमपणे करेल यात शंका नाही. विद्यार्थी हा नवचैतन्य निर्माण करणारा असतो.नवीन संशोधन वृत्ती वाळगणारा असतो आणि त्याच्या या संशोधन वृत्तीला प्रेरणा ही शाळेतूनच मिळते असते त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी साथ दिली तर निश्चितच त्यांच्यात असलेली संशोधन वृत्ती जोपासले जाते व त्यांच्या नवीन कल्पनांना वाव मिळतो आणि त्यांचा नक्कीच त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांना फायदा होणार आहे. असे प्रतिपादन यावेळी केले .
सदर विज्ञान दिनाचे आयोजन उत्तम कुंभार, दिपाली भापकर,उत्तम पाटील,विद्या पाटील,करूणा कोंडेकर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. जी. किर्तीकर यांनी केले. उत्तम पाटील व गजानन सावंत यांनी प्रयोग मांडणी बाबतचे सर्व नियोजन केले. केंद्रशाळा मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील व भाई माधवराव बागल प्रशालेच्या मुख्याध्यापिका पद्मिनी माने,समावेशीत शिक्षण समन्वयक राजेंद्र अपुगडे,निलेश पिसाळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभूदास दाभाडे, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व कार्यवाही साठी अथक परिश्रम घेतले.
सदर विज्ञान दिनाच्या निमित्ताने 163 प्रयोग या ठिकाणी दोन्ही शाळेच्या वतीने सादर करण्यात आले. डॉ.विजय कुंभार, डॉ अजितकुमार पाटील, पद्मिनी माने यांनी प्रयोगांचे निरीक्षण व परीक्षण केले. रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण व परिक्षण अनुराधा गायकवाड,मयूर दाभाडे,हर्षवर्धन माने, तमेजा मुजावर,कल्पना पाटील यांनी केले. तसेच विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्री काळे, मॅडम,रामेश्वर राठोड सर,संजीवनी फराकटे, गजानन सावंत सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी बैठक व्यवस्था, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन व नियोजन केले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी,माझी विद्यार्थी संघ, व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
आभार अमित पोटकुले यांनी मानले.