कोल्हापूर महानगरपालिका : तावडे हॉटेल परिसरात पहिल्या दिवशी 108 मिळकतींचा सर्व्हे
schedule24 Apr 26 person by visibility 140 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : तावडे हॉटेल चौकपासून ते गांधीनगरमधील १५८ एकरपर्यंत कोल्हापूर महापालिकेची जागा आहे. १९४५ पासून याची नोंद आहे. या जागेत एकूण १३३ गट आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीची दावा फेटाळला. तसेच जैसे थेचे आदेशही रद्द केले. गुरुवारी दि. २३ आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले.
यानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नगररचनाचे उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच पथकामार्फत सर्व्हेचे काम सुरु केले. या सर्व्हेमध्ये आज दिवसभरात 108 मिळकतींची मोजमापे घेऊन सर्व्हे पुर्ण करण्यात आला आहे. यामध्ये जुन्या व नवीन बांधकामांची लांबी, रुंदी मोजण्यात आली.
तसेच जागेवर जैसे थे परस्थिती असताना कोणकोणते बदल झालेत याची माहिती संकलीत करण्यात येत आहे.
या सर्व्हेसाठी मुख्य नियंत्रण नियंत्रण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक नियंत्रण अधिकारी म्हणून उपशहर रचनाकार एन एस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या सर्व्हेसाठी 5 पथके करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथक क्रमांक 1 मध्ये कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सर्व्हेअर अर्जुन कावळे, लिपिक भगवान मांजरे, दिपक हिले, उदय भोसले, शिपाई रमेश पाटोळो व मानसिंग सुतार. प्रथक क्रमांक 2 मध्ये कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, सर्व्हेअर श्याम शेटे, कनिष्ठ लिपीक संदीप भोई, सतीश माने, विजय वाघेला, कामगार सात्ताप्पा निरुके व वाहीद पैलवान. पथक क्रमांक 3 मध्ये कनिष्ठ अभियंता अभिलाषा दळवी, सर्व्हेअर दत्ता पारधी, कनिष्ठ लिपिक राहुल लोखंडे, विश्वजीत लोहार, शिवाजी कोकरे, कामगार दत्ता चौगले व तेजस घोरपडे.
प्रथक क्रमांक 4 मध्ये कनिष्ठ अभियंता अवधूत नर्लेकर, प्र.आरेखक खुशालचंद्र राजमाने, कनिष्ठ लिपिक राहुल चांडवले, सुदर्शन घाटगे, आकाश मेंडके, शिपाई राजाराम उलपे व राजु कदम. प्रथक क्रमांक 5 मध्ये कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सर्व्हेअर सचिन देवाडकर, कनिष्ठ लिपीक रश्मिकांत कवठेकर, अर्जुन बुचडे, शिपाई नितीन कांबळे, शिवाजी पाटील, संजय आयरेकर यांचा समावेश आहे. सदरची पथके सोमवारपर्यंत आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.