SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांच्या पेटंटला मान्यतातपोवन मैदानावर दि. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजनकाँग्रेसचा नगराध्यक्ष सभागृहात पाठवून हातकणंगलेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया : सतेज पाटील विभागीय माहिती कार्यालय - संविधान दिन साजराग्रंथालयांच्या भवितव्याविषयी विद्यापीठात चर्चासत्र यशस्वीडांबरी प्लांट सुरू करण्याच्या हालचालींना वेग; अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यानी प्रकल्पाची केली संयुक्त पाहणीकोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात; राष्ट्रनिर्माणात संविधानाचे महत्व अधोरेखितसमाजातील शेवटच्या घटकाचं हक्क आणि अधिकार अबाधित राखण्याचं काम संविधानाने केले : शीतल धनवडे कोल्हापूर : मतदारांना नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र सुरू‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन

जाहिरात

 

तपोवन मैदानावर दि. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन

schedule27 Nov 25 person by visibility 106 categoryउद्योग

▪️विविध नामांकित कंपन्यांसह, पशुपक्षी, जातिवंत जनावरे यांचा सहभाग - माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती

कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५ येत्या ५ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. अशी माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

 यावेळी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, जयवंत जगताप सर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, जिल्हा कृषी अधीक्षक  जालिंदर पांगिरे, डॉ. सुनील कराड विभागीय संशोधन संचालक, नामदेवराव परीट उपसंचालक कृषी विभाग, डॉ. प्रमोद बाबर साहेब पशु विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी., स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे यावेळी माजी खासदार  राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांची उपस्थिती असणार आहे. तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजक यांनी आवाहन केले आहे.

प्रदर्शनाचे २०२५ हे ७ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खतेआदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, जय इंडस्ट्रीज, मयुरेश टेकनॉलॉजी, गोविंद मिल्क सातारा, बिगमार्क इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, समृद्धी प्लास्टिक, वरद इंडस्ट्रीज, सिद्धिविनायक ड्रीप इरिगेशन, वनिता ऍग्रो, शक्तिमान रोटर, कुबोटा ट्रॅक्टर, महिंद्रा, पाटील ऑईल मशीन, प्रथम पेस्ट, ओंकार बंब, रॉयल एनफिल्ड, EV बाईक & मोटर्स,, कागल बंब, पेरु नर्सरी स्टॉल, बळीराजा आटा चक्की, रोनिक, सागर ऑटोमोबाईल, आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. याचबरोबर विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत.

प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. मागील दोन ते तीन वर्षात झालेल्या तांदळाची उचांकी विक्री पाहून याहीवर्षी तांदूळ महोत्सव देखील भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी तांदूळ, हळद, नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत. त्याची विक्री होणार आहे.

या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत. तीन दिवस शेतीविषयक तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes