SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी मेधावी ठरली राज्यस्तरीय इंग्रजी वाचक स्पर्धेत अव्वल

schedule01 Jun 26 person by visibility 325 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : 'वाचन कट्टा कोल्हापूर' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'स्टेट लेव्हल प्रोफॉन्ड रीडर्स कॉम्पिटिशन' (State Level Profound Readers Competition) या राज्यस्तरीय इंग्रजी वाचक स्पर्धेत प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची इयत्ता ९ वी 'ब' मधील विद्यार्थिनी  श्रावणी प्रशांत मेधावी हिने घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

'लेट्स नो अवर शाहू महाराज' (Let's know our Shahu Maharaj) या विषयावर श्रावणीने प्रभावी सादरीकरण केले. तिच्या या उत्कृष्ट वाचनशैलीचे आणि विषयाच्या मांडणीचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. या स्पर्धेतील यशाबद्दल तिला ७ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह (शिल्ड) आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते श्रावणीचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्रावणीच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सविता पाटील, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि सर्व विद्यार्थीनींनी तिचे व तिच्या पालकांचे  अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes