SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारीच्या सेवेतून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंढरपुरात 'निर्मलवारी-समृद्धवारी' व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातकेडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी केडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी गोविंदराव टेंबे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिक: सुधीर पोटेकोल्हापुरात उद्या होणार 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळाशिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारीडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद एस. पाटील यांना 'सीआरएस लीडरशिप अवॉर्ड'विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक व सामाजिक सलोखा मंच व समस्त मुस्लिम समाजातर्फे तीव्र धरणे आंदोलनCJP आंदोलन: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केंद्र सरकारला शनिवारपर्यंतचा अवधी

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात

schedule24 Jul 26 person by visibility 228 categoryराज्य

◼️मंत्री हसन मुश्रीफ यांची आढावा बैठकीत  माहीती
 ◼️५० किलोमीटर पानंदींच्या कामांना मिळणार प्रशासकीय मान्यता व निधी
          
कागल : मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व  उत्तूर विधानसभा मतदारसंघात मंजूर झाले आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत ५० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यापैकी एका क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा  समावेश आहे. तसेच; दुस-या क्लस्टरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर व आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर अशा एकूण २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा समावेश आहे.
           
मंत्री  मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कागल शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
​         
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील किमान सात ते आठ क्लस्टर्सना मंजुरीसाठी प्रयत्न आणि  पाठपुरावा करीत आहोत. प्रत्येक क्लस्टरमध्ये २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश होणार आहे. त्यापैकी;  पहिल्या क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. दुस-या क्लस्टरमध्ये  गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर लांबीचे शेतरस्ते व पाणंद रस्ते आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतरस्ते व पाणंद रस्ते,  असे २५ किलोमीटरचे मंजूर झालेले आहे.
            
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले​, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, ​गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे,​आजरा गटविकास अधिकारी सुभाष सावंत, ​गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, ​उपविभागीय पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज)सतीश होडगर, ​बळीराजा शेत पाणंद पारिसा जंगटे, गणपतराव सांगले, पांडुरंग तेलवेकर, ​बाबासाहेब सांगले, ​किशोर अहिरे, ​विजय शेळके, ​महेश मोहिते, ​अमित लोंढे, ​हरिश्चंद्र शितोळे, ​भूषण पाटील, एम. डी. सांगावकर, ​कल्याणी गोडसे, ​समीर खडकेवाले, ​महेश कुंभार, ​सुरज कुंभार, ​धनाजी मच्छेर, ​तेजस्विनी पवार, ​राहुल कुंभार, ​सचिन सावंत, ​विनायक कुलकर्णी, ​अश्विनकुमार कचरे, ​सी. ए. पाटील, ​अमित पाटील, ​महेश पवार, ​सुरेश बांदीवडेकर, ​पंडित कोडोलीकर, ​राजेंद्र गायकवाड, ​सतीश आणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes