पन्हाळा येथे उद्यापासून हजरतपीर शहादुद्दीन खतालवली यांचा उरूस
schedule23 Jan 25 person by visibility 543 categoryसामाजिक
पन्हाळा : येथील हजरतपीर शहादुद्दीन खतालवली यांचा उरूस शुक्रवार (दि. २४) पासून सुरू होत आहे. यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. २४) पहिल्या दिवशी दिवसभर मासाहेब यांच्या ओटी भरण्याचा विधी होणार आहे तर शनिवारी (दि. २५) पहाटे २.३० ते ४ वाजेपर्यंत सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मुख्य दर्यात गंधरात्र व ४.३० वाजता गलेफ अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी किल्लेदार दर्गाह व तानपीर येथे गलेफ अर्पण केला जाणार आहे.
त्यानंतर पूर्वापार चालत आलेली परंपरा जोपासत रविवारी (ता. २६) पहाटे ४ वाजता संभाजी महाराजांच्या मंदिरातून शाही इतमामात मुख्य दर्यात जाणारा शासकीय गलेफ अर्पण केला जाणार आहे. शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.२७) सायंकाळी महाप्रसाद वाटप होणार आहे.