दिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळा
schedule18 Mar 26 person by visibility 108 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: दिव्यांग व्यक्तीसाठीची युजीसी - योजना आणि सर्व समावेशी शिक्षण संसाधन केद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “उच्च शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांसाठी सुलभता मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके” (Guidelines for Accessibility and Standards for HEIs and University) या विषयावर येत्या सोमवारी (दि. २३) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेस डॉ. मनोज कुमार सहसचिव विद्यापीठ अनुदान आयोग(UGC), हे बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि डॉ. टाटा रामकृष्ण (IGNOU, New Delhi) तसेच, प्रा. संध्या लिमये (अध्यक्ष, सेंटर फॉर डिसॅबिलिटीज स्टडीज अँड स्कूल ऑफ सोशल वर्क) आणि डॉ. मधुरा नागचौधरी (सहाय्यक प्राध्यापक टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत.
सदरची कार्यशाळा राजर्षी शाहू सभागृहात सोमवारी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे. तरी सदर कार्यशाळेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले आहे.