कोल्हापुरात ए व बी वॉर्डचा रविवारी पाणी पुरवठा राहणार बंद
schedule22 Aug 25 person by visibility 286 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : साळोखेनगर उंच टाकी येथील गुरूत्ववाहीनीवर व्हॉल्व बसविणेचे काम रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी हाती घेणेत येणार आहे. सदरचे काम त्याच दिवशी रात्रीपर्यंत पुर्ण झालेनंतर पाणी पुरवठा सुरू करणेत येणार आहे. त्यामुळे या दिवशी सदर पाईपलाईनवरील अवलंबून असणा-या ए व बी वॉर्डच्या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
यामध्ये संपुर्ण ए, बी वॉर्डातील पुईखडी परिसर, कलिकते नगर, सुलोचना पार्क परिसर , इंगवले कॉलनी परिसर, नाना पाटील नगर, आपटेनगर, कणेरकरनगर, सानेगुरूजी वसाहत, राजोपाध्येनगर, बिडी कॉलनी, हिंदु कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवगंगा कॉलनी, वाल्मीकी वसाहत, जिवबा नाना परिसर, बापूरामनगर परिसर , साळोखेनगर परिसर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्ल्पलेस, तपोवन परिसर, देवकर पाणंद परिसर, मोरे माने नगर परिसर,संभाजीनगर स्टँड परिसर, नाळे कॉलनी, रामानंद नगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी परिसर, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी परिसर, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी परिसर, संभाजीनगर परिसर, गंजीमाळ परिसर,संपुर्ण शिवाजी पेठ परिसर, राजकपूर पुतळा परिसर, संपुर्ण मंगळवार पेठ परिसर, पोतणीस बोळ परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग परिसर, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज परिसर, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर परिसर व सलग्नीत ग्रामिण भागाचा समावेश आहे.
तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.