SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!वारणा विद्यापीठात २९ सप्टेंबरला ‘मेगा जॉब फेअर

जाहिरात

 

शिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाट

schedule23 Sep 26 person by visibility 136 categoryगुन्हे

शिरूर : शिरूरमधील रोहिदास नगर परिसरात महावितरणच्या भीषण आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा बळी गेल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. रत्नाबाई धोंडीराम माने (वय ७४) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र रोष व्यक्त केला आहे.

रोहिदास नगर परिसरातील जळाऊ लाकडांच्या ढिगाऱ्यावर एक  विद्युत तार तुटून पडली होती. या तुटलेल्या तारेमध्ये तब्बल २० केव्हीचा प्रवाह सुरू होता. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास याच विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने ७४ वर्षीय रत्नाबाई माने यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने, वेळीच त्यांच्या नातवानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी डीपिधून वीज पुरवठा बंद केल्यानंतर ही तुटलेली तार विद्युत पुरवठा खंडीत झाली.

या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही जुन्या आणि जीर्ण विद्युत तारा व खांब कायम आहेत. महावितरणच्या या वाढत्या लापरवाह कारभारामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असून, अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी संतप्त मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वाढत्या जनक्षोभासमोर अखेर महावितरणला नमते घ्यावे लागले. महावितरणचे अभियंता ए. एन. अडके यांनी मृत रत्नाबाई यांच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान, शिरूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे शिरूर परिसरातून हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes