तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जर्मनीतील उच्च शिक्षण व करिअर संधी विषयक कार्यशाळेचे आयोजन
schedule24 Nov 25 person by visibility 46 categoryराज्य
वारणानगर : वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जर्मन भाषा, जर्मनीतील उच्च शिक्षण व उपलब्ध करिअर संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परदेशातील बहुविद्याशाखीय शिक्षणाची ओळख करून देणे आणि जर्मन भाषा परदेशी भाषा म्हणून शिकण्याचे महत्त्व समजावणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर साहेब), वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री एन. एच. पाटील, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीनी, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यशाळेचे मार्गदर्शन वैशाली दाबके करणार असून त्यांना जर्मन भाषेत एम.ए. पदवी आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्या जर्मन भाषा शिकवत आहेत. सध्या त्या गोएथे-इन्स्टिट्यूट मॅक्स मुलर भवन, पुणे येथे शैक्षणिक सेवांच्या प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, शिक्षक कार्यशाळा आयोजित केल्या असून सीबीएसईसाठी तयार केलेल्या ‘हॅलो ड्यूश १ आणि २’ या पाठ्यपुस्तकांच्या त्या सह-लेखीका आहेत. तसेच मोठ्या गटांना जर्मन शिकवण्यासारख्या विविध प्रकल्पांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. व्ही. लिंगराजु असतील. या उपक्रमासाठी इच्छुक विद्यार्थी व वाचकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.