SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे तात्काळ मुजवा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराकोल्हापुरात लक्ष्मीपुरी येथे कलापुरीतर्फे रविवारी कलादालनाचे लोकार्पणकेआयटीमध्ये ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’चे उद्घाटनजागतिक रेंजर दिन: निसर्ग आणि वन्यजीवांचे मूक पहारेदारमुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक : जिल्हाधिकारीज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

केआयटीमध्ये ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’चे उद्घाटन

schedule31 Jul 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक

▪️जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्धकोल्हापूर : तांत्रिक शिक्षणाला जागतिक दर्जाची दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गाठला आहे. जागतिक सॉफ्टवेअर कंपनी बेंटली सिस्टीम्सच्या सहकार्याने ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ या अत्याधुनिक सेंटरची स्थापना करण्यात आली. या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर डिझाइन तंत्रज्ञान आणि उद्योगात वापरले जाणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण कॅम्पसमध्येच मिळणार आहे.

सेंटरचे उद्घाटन बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव  दीपक चौगुले, विश्वस्त  भरत पाटील व  सुनील कुलकर्णी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी,ष बेंटलीच्या सिनियर मॅनेजर श्रीमती मोनिका जाधव, अधिष्ठाता आणि विभागप्रमुख उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सचिव  दीपक चौगुले म्हणाले, "विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाला अपेक्षित कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी जोडले जातील आणि रोजगाराच्या नव्या संधी त्यांच्यासाठी खुल्या होतील."  

श्रीमती मोनिका जाधव यांनी बेंटली एज्युकेशन उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, जगभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक बेंटली इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग सॉफ्टवेअर आता केआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट श्री. राहुल पाटील यांनी केआयटीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले, "भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे सिव्हिल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे."संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बेंटलीच्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

सेंटरचे प्रमुख डॉ. रोहन नलवडे यांनी पुढील टप्प्यात केआयटीमध्ये ‘डिजिटल ट्विन कॅम्पस’ विकसित करणार असल्याची माहिती दिली. यामुळे संपूर्ण कॅम्पसचे 3D डिजिटल मॉडेल तयार होऊन नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापन अधिक स्मार्ट, अचूक आणि कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले तसेच सर्व विश्वस्तांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes