कर्नाटकात काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल; कार्यकर्त्यांचा जल्लोष; भाजपला मोठा धक्का
schedule13 May 23 person by visibility 1350 categoryराजकीय
कर्नाटक : कर्नाटकात भाजप सत्ता गमावताना दिसत आहे. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनण्याकडे आगेकूच दिसून येत आहे. मतमोजणी सुरू असून काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 19, इतर चार जागांवर आघाडीवर आहे. निकालाचा कौल पाहता काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
कर्नाटकात 10 मे रोजी 224 जागांसाठी मतदान झाले होते. राज्यात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आज मतमोजणी होत असून कर्नाटकात भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
भाजप नेते सदानंद गौडा म्हणाले, कोणताही अंतिम निर्णय देणे खूप घाईचे आहे, 3-4 फेऱ्यांनंतर थोडी स्पष्टता येईल परंतु हे देखील अंतिम नाही, प्रत्येक टप्पावर खडतर लढत आहे .
कर्नाटक निवडणुकीत भाजपचा काँग्रेसकडून दारुण पराभव होताना दिसत आहे. माध्यमांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, आम्ही निकालांचे विश्लेषण करू आणि लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून पुनरागमन करू.