SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तसिद्धगिरी हॉस्पिटलने रचला जागतिक वैद्यकीय इतिहास: जगातील पहिली १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत

जाहिरात

 

शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

schedule10 Jun 26 person by visibility 142 categoryगुन्हे

कोल्हापूर  : ​कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) एका धाडसी कारवाईत शिरोली एमआयडीसी परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्यांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य मालकासह एकूण तीन जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

​पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी अवैध गॅस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला शिरोली एमआयडीसीमधील रिक्षा व टेम्पो असोसिएशन चौकात एका मारुती सुझुकी टेम्पोमधून (क्रमांक MH-०९-GJ-३२७४) ४ किलोच्या घरगुती गॅस टाक्या विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.  

​मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता, मयुर संतोष भरणकर (वय २६, रा. उचगाव) आणि मो. वसीम सईद खान (वय ४४, रा. वळीवडे, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) हे दोघे टेम्पोमधून टाक्यांची विक्री करत असल्याचे आढळले. हे दोघे मुख्य मालक मोहित सुरेशचंद गुप्ता (रा. वळीवडे) याच्या सांगण्यावरून कामगारांना गॅस पुरवत होते.  


​या कारवाईत पोलिसांनी ४ किलोच्या एकूण ३८ गॅस टाक्या आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ३ लाख २० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes