SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहितीडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हपुरोगामी विचारांचे दीपस्तंभ: बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडसेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणीमुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा : पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

जाहिरात

 

‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेट

schedule17 Mar 26 person by visibility 93 categoryउद्योग

कोल्हापूर : स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रदर्शनाला सदिच्छा भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष दीपक आंबर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ब्राह्मण सभा करवीरचे उपाध्यक्ष मधुसूदन धर्माधिकारी, कार्यवाहक श्रीकांत लिमये, संचालक  चौगले, व्यवस्थापक अशोक जोशी व कर्मचारी, बीबीएफ ग्रुपचे अध्यक्ष राजन छत्रे, नगरसेविका दिपा अजित ठाणेकर तसेच जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे प्रदर्शन ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, 167 बी वॉर्ड, मंगळवार पेठ, बिनखांबी गणेश मंदिराजवळ आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात एकूण 19 स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये विशेषतः महिला उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले होते.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने तसेच आकर्षक हस्तकला वस्तू थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळाली. स्थानिक उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अध्यक्ष दीपक आंबर्डेकर म्हणाले, स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आहे.
 ‘अमृतपेठ’सारख्या प्रदर्शनांमुळे स्थानिक उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते.

यावेळी अनेक मान्यवर, स्टॉलधारक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes