SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहितीडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हपुरोगामी विचारांचे दीपस्तंभ: बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडसेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणीमुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा : पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

जाहिरात

 

पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना

schedule17 Mar 26 person by visibility 117 categoryराज्य

कोल्हापूर : पर्यटन संचालनालयामार्फत नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे विभागातील इच्छुक युवक, युवतींसाठी Tourist Guide Training आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा व पर्यटन संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती करून देण्यासाठो पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाइड) तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी गुगल फॉर्मवर अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी केले. 

पुणे प्रादेशिक विभागातील (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) इच्छुक उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण 200 युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 45 वर्षे असावे व उमेदवार किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

ग्वाल्हेरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अॅन्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयटीटीएम) तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. सात दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना पर्यटन प्रमाणपत्र संचालनालयाकडून देण्यात येईल. सिंहस्थ कालावधीत टूर गाइड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. फिरस्तीची आवड असलेल्या युवकांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. लांघी यांनी केले आहे.
 
इच्छुक नोंदणीसाठी गुगल फॉर्मवर उपलब्ध करून दिली असून, 20 मार्च अखेर दुपारी 3 वाजेपर्यंत दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. अर्जाची निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल. इच्छुकांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbn0rmXID8oR8hfCD_Zdx1PyHbLDcUeAynPwPWHs5RgVKG4Q/viewform?usp=publish-editor लिंकवर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे दूरध्वनी क्र. 8080035134 वर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes