SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजय

जाहिरात

 

‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

schedule26 May 26 person by visibility 270 categoryराज्य

कोल्हापूर : पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने २५ मे  पासून ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.

या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमधून डिजिटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर सन २०२६-२७ या वर्षासाठी या विशेष डिजिटल शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले आहे.

डिजिटल शेतीशाळा २०२६ चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
दर सोमवारी सोयाबीन सायंकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत.  दर मंगळवारी खरीप ज्वारी सायंकाळी ६:१५ ते ७:१५ वाजेपर्यंत.  दर बुधवारी भुईमूग, सायंकाळी ६:१५ ते ७:१५ पर्यंत व  भात सायंकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत.  दर शुक्रवारी नाचणी  सायंकाळी ६:१५ ते ७:१५ पर्यंत व तूर, मूग, उडीद सायंकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत. तर  दर शनिवारी भाजीपाला सायंकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत राहील. सर्व शेतीशाळा हे वर नमूद वारांना दिलेल्या वेळेनुसार सुरु होणार आहेत.

शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, 'फार्मर कप' स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट आणि वनपट्टे धारक या सर्वांनी या डिजिटल शेतीशाळेला सहभागी व्हावे. या उपक्रमाबाबत अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes