SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पूर व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज : डॉ. वेंकटेश मेरवाडे‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी कार्यशाळा शनिवारीपावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे : मंत्री गिरीश महाजनअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना; कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक खात्यांची माहिती अपलोड‘विकसित भारत – जी-राम-जी’ मुळे गाव-खेड्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधला जाईल : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडकोल्हापूर जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत बंदी आदेश लागूअंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासोबत कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा राबवावा : आ. राजेश क्षीरसागरश्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी ) हक्कदार श्रीपूजक मंडळ व समिधा प्रतिष्ठान यांचे मार्फत महापालिकेच्या शाळांना दफ्तर व शैक्षणिक साहित्य प्रदानजागतिक क्रीडा पत्रकार दिन: खेळांच्या मैदानातून जगाला माहिती देणारा 'आवाज'

जाहिरात

 

‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी कार्यशाळा शनिवारी

schedule02 Jul 26 person by visibility 90 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शालेय विद्यार्थी आणि महिलांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल इम्युनिटी’ या विषयावर एकदिवसीय पथदर्शी कार्यशाळेचे आयोजन शनिवार, 4 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक करण्यात आले आहे.  कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी आणि महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प असून, त्याची सुरुवात ऐतिहासिक कोल्हापूर शहरातून होत आहे.

हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकरता करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाचे प्रशासकीय अधिकारी राजेश वैद्य यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes