SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाददर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमबारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाववन्यजीव: पृथ्वीचा अनमोल ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार!पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजनअग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडीलोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जाहिरात

 

दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रम

schedule03 Mar 26 person by visibility 77 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर म्हणून  रुपाराणी निकम यांची नुकतीच निवड झाली आहे. महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमाची सुरुवात गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकातून करण्यात येणार आहे. या जनता दरबारामध्ये महापौर  रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह या दिवशी सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागातून शहरातील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा महापौरांचा मानस आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes