+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule16 Jul 24 person by visibility 346 categoryगुन्हे
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बस- ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला. 

हौसाबाई पाटील रा. घेसर, गुरुनाथ महाराज पाटील रा. नारिवली, रामदास नारायण मुकादम रा. नावाळी, अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. जखमींवर पनवेल येथील एमजीएम आणि उपजि रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 अपघातानंतर मुंबई एक्स्प्रेस हायवेची मुंबई-लोणावळा लेन तीन तास बंद होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर पुन्हा वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

डोंबिवली वरून आषाढी एकादशीनिमित्त ५ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या. रात्री पावणे एकच्या दरम्यान महामार्गावर ट्रॅव्हल्स पोहचली असता बस आणि ट्रक्टरची धडक झाली. बस धडकल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस महामार्गावरून ३० ते ४० फुट खोलखड्यात पडली. बसमधील ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ भाविक जखमी झाले.