SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारकलोकसेवेचा नवा संकल्प: उपमहापौर अक्षय जरग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटनएचडीएफसी बँकेत मोठी घडामोड: चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा!डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात भिवंडी जेल फोडून पळालेला 'जंजीर' फेम अट्टल गुन्हेगार कोल्हापुरात जेरबंद!कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजनचैत्राची सोनेरी पहाट आणि विजयाची गुढी: मराठी नववर्षाचा जल्लोष!आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

जाहिरात

 

विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारक

schedule19 Mar 26 person by visibility 130 categoryमहानगरपालिका

 हसन मुश्रीफ यांच्या पाहणीनंतर जागा झाली निश्चित

कोल्हापूर  : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची जागा गुरुवारी अंतिम करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व महापौर रुपाराणी निकम यांच्या पाहणीनंतर अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी या जागेवर शिक्कमोर्तब करण्यात आले. कोल्हापुरातील आर्किटेक्ट सुनील पाटील या स्मारकाचा प्लॅन तयार करणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

स्व.अजितदादा पवार यांचे कोल्हापुरसाठी मोठे योगदान असून त्यांचे कोल्हापुरात स्मारक होण्यासाठीचा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेच्यावतीने जागेचा शोध सुरु होता. विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची अर्धा एकरापेक्षा जास्त जागा खासगी कंपनीला सुशोभीकरणासाठी देण्यात आली होती. या जागेची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम यांनी गुरुवारी पाहणी केली. मुख्य चौकात जागा असल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या जागेला तत्काळ हिरवा कंदील दर्शविला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अजित पवार यांच्या पुतळा व स्मारकासाठी केएसबीपीची जागा योग्य आहे. अत्यंत दर्शनी भागात ही जागा असून बाहेरुन कोल्हापुरात येणाऱ्या लोकांना अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचे सहजपणे दर्शन घेता येणार आहे. योगायोगाने या जागेवर अजितदादा पवार यांचा पदस्पर्श झाला आहे. या परिसरातील राजाराम महाविद्यालयाला अजितदादा पवार यांनी निधी दिला होता. अजितदादा पवार यांचे कोल्हापूरशी घट्ट ऋणानुबंध राहिले आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी कोल्हापुरशी जोडल्या आहेत. थेट पाईपलाईन, आयटी पार्क, शासकीय महाविद्यालय अशा अनेक प्रकल्पांसाठी अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक सरकारच्या सहकार्याने महापालिका उभारत आहे याचा आनंद आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्मारक व पुतळ्याचा प्लॅन आर्किटेक्ट सुनील पाटील यांना तयार करायला सांगा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना दिल्या.

महापौर  रूपाराणी निकम म्हणाल्या, अजितदादा पवार यांची आठवण राहवी यासाठी हे स्मारक उभारण्यात येत आहे. दोन-तीन जागांमध्ये केएसबीपीची जागा जास्त योग्य असल्याने ही जागा अंतिम केली आहे. 

खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी पाहिलेली जागा मोक्याची आहे. विमानतळावर येताना पहिल्यांदा दर्शनी भागात अजितदादा पवार यांचा पुतळा दिसेल. या जागेचे चांगले सुशोभीकरण करुन एक दर्जेदार पुतळा महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापुरात होईल. जागा निश्चित झाली असून पुढील प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच पुतळ्याचे काम सुरू होईल. 

     यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, गटनेता मुरलीधर जाधव, आदिल फरास, नगरसेवक विजय जाधव, उप शहर अरुण गुजर, भैय्या माने, सतीश लोळगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes