SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एचडीएफसी बँकेत मोठी घडामोड: चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा!डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात भिवंडी जेल फोडून पळालेला 'जंजीर' फेम अट्टल गुन्हेगार कोल्हापुरात जेरबंद!कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजनचैत्राची सोनेरी पहाट आणि विजयाची गुढी: मराठी नववर्षाचा जल्लोष!आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

भिवंडी जेल फोडून पळालेला 'जंजीर' फेम अट्टल गुन्हेगार कोल्हापुरात जेरबंद!

schedule19 Mar 26 person by visibility 128 categoryगुन्हे

कोल्हापूर : भिवंडी येथील सबजेलमधून बाथरूमचे ग्रील उचकटून पसार झालेल्या आणि तब्बल ३१ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रॅकेटमधील अट्टल गुन्हेगाराला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शिताफीने अटक केली. रविंद्र धनाजी भोसले (वय २४, रा. नारपोली, भिवंडी) असे या अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

आरोपी रविंद्र भोसले याच्यावर जबरी चोरी आणि घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भिवंडी सबजेलमध्ये असताना, त्याने बाथरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून पलायन केले होते. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वीही त्याने रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्याचा इतिहास असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक  योगेशकुमार  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नाकाबंदी आणि कोबिंग ऑपरेशन राबवले जात होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाला आरोपी शिवाजी पुलाजवळील पंचगंगा घाटावर असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पीएसआय आतिश म्हेत्रे व पथकाने तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 

 ३१ गुन्हे दाखल असलेला हा अट्टल गुन्हेगार कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा गजाआड झाला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शांतीनगर (ठाणे) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes