पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’
schedule06 Oct 26 person by visibility 111 categoryराजकीय
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशसेवेला दिलेल्या २५ वर्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात ‘सेवा ज्योती यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत भाजपा कोल्हापूरच्या वतीनेही भव्य सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेला दसरा चौक येथून सकाळी ठीक ९ वाजता प्रारंभ होणार आहे. दसरा चौक येथून व्हिनस कॉर्नर – असेंब्ली रोड – महावीर गार्डन – खानविलकर पेट्रोल पंप मार्गे ही यात्रा भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे पोहोचणार आहे.
यात्रा भाजपा जिल्हा कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शनपर संबोधन पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रितपणे ऐकणार आहेत. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
‘सेवा ज्योती’ ही केवळ एक यात्रा नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवाभावी, राष्ट्रनिर्माणाच्या आणि विकसित भारताच्या संकल्पाशी जोडले जाण्याचा सामूहिक उपक्रम आहे. या यात्रेत भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या प्रवासाला अभिवादन करण्यासाठी आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पाशी आपली बांधिलकी व्यक्त करण्यासाठी भाजपा कोल्हापूरच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.