SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!कोरे अभियांत्रिकीत ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ कार्यक्रमाचा शुभारंभसी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वीडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेशआधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव: शिवाजी विद्यापीठात पार पडली ArcGIS Pro कार्यशाळाजैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

"लाभले आम्हांस भाग्य..."

schedule05 Oct 26 person by visibility 141 categoryसामाजिक

 ◼️शिवाजी विद्यापीठात अभिजात मराठीचे गौरवगान; प्रेक्षकांचा जल्लोषी प्रतिसाद

कोल्हापूर : अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मायमराठीचे जतन, संवर्धन आणि प्रचार, प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रतिबद्ध आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीही मराठीच्या संवर्धनासाठी आपला वाटा उचलण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी आज येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आज सायंकाळी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह -२०२६ या उपक्रमांतर्गत आयोजित 'अभिजात मराठी, अभिमान मराठी' या सांगितिक - सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या. 

अभिजात मराठी भाषेचे गौरवगान करणाऱ्या या कार्यक्रमास प्रेक्षक, श्रोत्यांचा प्रचंड जल्लोषी प्रतिसाद लाभला.

उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, मराठी भाषेच्या अनेक बोलींमध्ये कोल्हापूरची मराठी ही केवळ देशातच नव्हे, तर जगात वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय आहे. या भाषेचा आपण नेहमी अभिमान मिरवला पाहिजे. 

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल राज्यभरातील विद्यापीठांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठालाही या गोष्टीचा मोठा अभिमान असल्याने हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. येथून पुढेही असे मराठी भाषेच्या गौरवपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सुरवातीला मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 🔵 कोल्हापूरच्या सुपुत्रांनी गाजविला कार्यक्रम
कोल्हापूरचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध गायक बंधू डॉ. अभिजीत कोसंबी आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी आपल्या गायनवैविध्याने अभिजात मराठीचा हा कार्यक्रम गाजविला. भक्तीगीतांपासून वासुदेव गीतांपर्यंत आणि आदिवासी गीतांपासून चित्रपट गीतांपर्यंत अशी अनेकविध गीते गाऊन त्यांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली. दिगंबर नाईक यांचे नेटके संयोजन लाभलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेचे वैविध्य आणि वैभव दर्शविणाऱ्या गीतांबरोबरच मंगळागौर, लावणी, आदिवासी, गोविंदा, कोळीनृत्य इत्यादी नृत्यप्रकारांचेही सादरीकरण करण्यात आले. प्रेक्षकांचा त्यांना जल्लोषी प्रतिसाद लाभला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes