+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेती व्यवसाय नियोजनबद्ध करावा... adjustबारावीच्या निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता adjustपन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून adjustमुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज !; 74 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क adjustआमदार पी.एन. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग, राष्ट्राध्यक्षांशी संपर्क नाही adjustकोल्हापूर आंबा महोत्सव : कोल्हापूरकरांना अस्सल, नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा २३ मे पर्यंत मिळणार adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustसंपूर्ण कोल्हापूर जैन संघ आणि तरुणांची एकजूट पाहून माझे हृदय द्रवते : पं. राजरक्षित विजयजी adjustशिवाजी विद्यापीठच्या गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ “कलर अवार्ड “ वितरण उत्साहात
1000679152
SMP_news_Gokul_ghee
schedule09 May 24 person by visibility 257 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वारणानगर.या संस्थेतील फिटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेक. व वेल्डर विभागातील २७ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झाली. कंपनीने संस्थेमध्ये गटचर्चा’ इंटरव्ह्यू आयोजित करत चार विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली. विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या नामांकित कंपनीत नोकरीची(शिकाऊ उमेदवारी) संधी मिळाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य बी.आय.कुंभार यांनी दिली. या कंपनीमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील संबधीत विविध ऑपरेटिंग कंपन्या आहेत. 

या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा मौलिक सल्ला केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री, प्राचार्य बी.आय.कुंभार, गटनिदेशक आर.आर.कापरे,ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर पी.पी.पाटील, एस.एस.पाटील,बी.टी.वायदंडे, एस.आर.बुद्दे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांचे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्याची नावे अशी: फिटर: अनिकेत कांबळे,अविनाश पाटील,क्षितीज कांबळे,प्रतिक जाधव,प्रतिक पाटील,शुभम माजळकर,सुधर्म डुबल,वैभव नांगरे,विशाल चिबडे,विवेक जाधव. 

वेल्डर: अक्षय निकम,अक्षय थोरात,हर्षल कांबळे,पवन पडळकर,प्रज्वल जाधव,प्रणव शिंदे,संस्कार कांबळे,स्वप्नील गावडे,डॉन शिकलगार. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: अविष्कार पाटील,दिग्विजय बिराजदार,ओंकार पवार,रेहान शिकलगार,स्नेहदीप शेलार,यश' बेलेकर. इलेक्ट्रिशियन: साईराज कोतुलकर,तनिष्क घाटगे