SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

केआयटी च्या वतीने स्टार्टअप उद्यमींसाठी ‘आस्क मी एनीथिंग’ चे आयोजन; केआयटीच्या आय.आर.एफ चा पुढाकार

schedule30 Nov 25 person by visibility 460 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : येथील केआयटी च्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन च्या वतीने स्टार्टअप सुरू करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयोगी व संवादात्मक अशा ‘आस्क मी एनीथिंग’ अशा शीर्षकाच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले.

स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना त्यांच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शनाची गरज ओळखून ‘आस्क मी एनीथिंग’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमात विविध संबंधित विषयांवर अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांशी थेट चर्चा व प्रश्नोत्तरे करण्याची संधी मिळणार आहे २२ नोव्हेंबर २५ ते ८ फेब्रुवारी २६ या कालावधीत एकूण ६ सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.स्टार्टअप रजिस्ट्रेशन पासून शासकीय योजना, शासकीय नियमांची पूर्तता,पैसा उभारणी, मार्केट स्ट्रॅटेजी, बिजनेस मॉडेल, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग,अशा सर्व विषयांचा समावेश या विविध सहा सत्रांमधून करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्राचे वक्ते होते प्रदीप रासनकर (कंपनी सेक्रेटरी)  वक्त्यांनी स्टार्टअप ची नोंदणी, विविध विषयांची पूर्तता, टॅक्सेस, ऑडिट त्याचे फायदे याबाबत माहिती दिली तसेच राज्य व केंद्र शासनाच्या स्टार्टअप विषयातील योजनांची सविस्तर माहितीही दिली.उपस्थितांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन त्यांनी केले.या उपक्रमासाठी डॉ.मोहन वनरोट्टी, मुख्य अन्वेषक  निधी आयटीबीआय व संचालक केआयटी यांचे मोलाचे मार्गदर्शन या आयोजनासाठी लाभले. 

संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले यांचे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केआयटी आयआरएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी यांनी केले. केआयटी आयआरएफ च्या प्रवासाबद्दल व सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रमुख पाहुण्यांना व उपस्थितांना ओळख करून दिली. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  समीर पुनस्कर (इंक्युबेशन मॅनेजर, स्टार्ट अप्स आणि उपक्रम केआयटी आयआरएफ) यांनी केले. आभार   देवेंद्र पाठक (इंक्युबेशन मॅनेजर, बिजनेस आणि ऑपरेशन) यांनी केले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  ऋषिकेश दुधगावकर,  संदीप लाड,  पार्थ हजारे व विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.उपस्थित नव उद्योजकांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले व भविष्यातील सर्व उपक्रमात अजून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes