+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustसाई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकलेने पाच हजार दंड; मोरया, स्टार, जानकी हॉस्पीटल व ॲस्टर आधार हॉस्पीटलला दंडाची नोटीस adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, मृतदेह सापडला adjustशेती व्यवसाय नियोजनबद्ध करावा... adjustबारावीच्या निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता adjustपन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून adjustमुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज !; 74 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क adjustआमदार पी.एन. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग, राष्ट्राध्यक्षांशी संपर्क नाही adjustकोल्हापूर आंबा महोत्सव : कोल्हापूरकरांना अस्सल, नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा २३ मे पर्यंत मिळणार adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद
1000679152
SMP_news_Gokul_ghee
schedule09 May 24 person by visibility 205 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिका मालकीचे दुकानगाळे, खुल्या जागा, केबीन, यांचे भाडेनिश्चितीकामी राज्य शासनाचे दि.06 नोंव्हेबर 2023 चे अधिसुचनेप्रमाणे महापालिकेच्यावतीने तीन टप्यात सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका मालकीचे दुकानगाळे, खुल्या जागा, केबीन यांचे सन 2015-16 ते सन 2023-24 या कालावधीमधील भाडे निश्चितीकरण दंडव्याजामध्ये सवलत योजना राबविण्यात आलेली आहे. यामध्ये दि.15 मार्च 2024 ते 14 एप्रिल 2024 या एक महिन्याच्या कालावधीसाठी गाळेधारकांनी एक रकमी रक्कम भरल्यास दंडव्याज रक्कमेत 50 टक्के सवलत योजना जाहिर करण्यात आली होती. यानंतर सोमवार, दि.15 एप्रिल 2024 ते मंगळवार, दि.14 मे 2024 या एक महिना कालावधीमध्ये गाळेधारकांनी एक रक्कमी रक्कम भरलेस दंडव्याजामध्ये 40 टक्के सवलत देण्यात आली होती. तर दि.15 मे 2024 ते 14 जून 2024 अखेर 30 टक्के सवलत योजना देण्यात येणार आहे.

  50 टक्के सवलत योजनेमधून 388 गाळेधारक व खुलीजागाधारक यांनी लाभ घेतला असून यामध्ये रु.5,61,06,589/- इतकी रक्कम महानगरपालिकेस जमा झालेली आहे. तर दुस-या टप्यात 40 टक्के सवलत योजनेमधून रु.1 कोटी 27 लाख 44 हजार 140 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. या योजनेस गाळे व खुली जागाधारक यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या 40 टक्के सवलतीची मुदत ही दि.14 मे 2024 अखेर असल्याने या सवलत योजनेचे शेवटचे 6 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यानंतर दि. 15 मे ते दि.14 जून 2024 या एक महिना कालावधीसाठी एक रक्कमी रक्कम भरलेस दंडव्याज रक्कमेत 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 

तरी उर्वरित सर्व गाळेधारकांनी व खुल्या जागाधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत भाडे रक्कम भरुन महापालिकेस सहकार्य करावे व गाळे सिलबंद करणे यासारखे कारवाईचे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत करण्यात आले आहे.