+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्रातील पहिला ‘गोकुळ’ चा हर्बल पशुपूरक प्रकल्प; जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने : अरुण डोंगळे adjustकोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन सतर्क रहा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली; वाहतुकीस पर्यायी मार्गाचा अवलंब; राधानगरी धरणातून 1450 क्युसेक विसर्ग adjustकोणत्याही संस्थेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर : मेधा जेरे adjustडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची नामांकित ‘भारत फोर्ज ‘ कंपनीमध्ये निवड adjustशिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना डीबीटीसाठी बँक खाते व आधार लिंक करा : उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी adjustगजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustविशाळगड प्रकरणः कोल्हापुरात एमआयएमची पावसात निदर्शने; हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी adjustविशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा
1000867055
1000866789
schedule10 Jul 24 person by visibility 264 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील - हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व तुळशी नदीवरील- बीड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.97 टीएमसी, तुळशी 1.77 टीएमसी, वारणा 17.32 टीएमसी, दूधगंगा 8.85 टीएमसी, कासारी 1.26 टीएमसी, कडवी 1.72 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.38 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 1.11 टीएमसी, जंगमहट्टी 1.00 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.01 टीएमसी, सर्फनाला 0.28 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.6 फूट, सुर्वे 24.5 फूट, रुई 55.3 फूट, इचलकरंजी 52.6 फूट, तेरवाड 47.3 फूट, शिरोळ 37 फूट, नृसिंहवाडी 34 फूट, राजापूर 23.9 फूट तर नजीकच्या सांगली 9 फूट व अंकली 10.9 फूट अशी आहे.