SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

schedule18 Mar 26 person by visibility 141 categoryराज्य

मुंबई  : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

 १ एप्रिल २०२६ पासून  मानधनात  वाढ करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर गाव पातळीवर, आदिवासी , दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. तसेच आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यातही स्त्री परिचर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटनाकडूनही होत होती.

अंशकालीन स्त्री परिचरांना  2019 च्या शासन निर्णयानुसार दरमहा तीन हजार रुपये मानधन अदा करण्यात येत होते. स्त्री परिचरांच्या कामाचे बदलते स्वरूप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करता आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात तीन हजार रुपये वाढ केली असून आता त्यांना सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल २०२६ पासून देण्यात येणार आहे.

सर्व जिल्हा परिषदांनी अंशकालीन स्त्री परिचरांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कार्यवाही करावी. तसेच दरमहा दहा तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes