SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठावडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्रसंथ चाल, सुरक्षित भविष्य: जागतिक कासव दिन!सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर'सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना'पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळ

जाहिरात

 

कोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठाव

schedule23 May 26 person by visibility 99 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आज सकाळी ७ वाजल्यापासून स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात आले. ही स्वच्छता मोहीम महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत १५ टन खरमाती, प्लास्टिक, तणकट व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

​ही स्वच्छता मोहीम माऊली पुतळा ते जवाहरनगर रोड, माऊली पुतळा ते सायबर चौक आणि एनसीसी भवन या परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्य रस्ते, फूटपाथ, डिव्हायडरची स्वच्छता करून, प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. या कामासाठी २ आयवा डंपर, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीचा वापर करण्यात आला.

​या मोहिमेत नगरसेवक अभिजीत मोकाशी, उमेश पोवार, नगरसेविका  पूजा पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, इस्माइल बागवान, सतीश पोवार, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, महापालिका आरोग्य विभागाचे ३० कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes