डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्र
schedule23 May 26 person by visibility 158 categoryशैक्षणिक
अतिग्रे : येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे तंत्रनिकेतन डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या सुविधा केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे स्कॅनिंग, पडताळणी, कागदपत्रे अपलोड, अर्ज निश्चिती आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डिप्लोमानंतरचे उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी, कॅम्पस प्लेसमेंट व विविध अभ्यासक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांकडून दिली जात आहे.
डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज निश्चित करणे आवश्यक असून, प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि शिष्यवृत्ती योजनांची माहिती सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी त्यांनी केले आहे.