SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणीवारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीकोल्हापूर येथील बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य, शर्वरी कबनूरकर उपविजेतीराईट फ्लायर III: विमान वाहतूक इतिहासातील सुवर्णपानबदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्प

जाहिरात

 

जैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणी

schedule05 Oct 26 person by visibility 143 categoryआरोग्य

जैनापूर : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने जैनापूर येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा २८६ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

शिबिरात १९१ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ९५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या आरोग्य अभियानांतर्गत शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत यापूर्वी कवठेसार, कोथळी, दानोळी, उमळवाड व चिपरी येथे शिबिरे घेण्यात आली आहेत. जैनापूर येथील शिबिरातील २८६ नागरिक धरून या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण २ हजार ७३० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली आहे. शिबिरासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले. नागरिकांनी या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी कुमार पाटील, विजयकुमार पाटील, शरद पाटील, संदीप दानोळे, योगिराज कोळी, कैप कोळी, संदीप पाटील, संतोष कोळी, विद्याधर पाटील, सुनील पाटील, आनंदराव बिरंजे, अनिल पाटील, लालासो रणनवरे, युवराज कोळी, हरिश्चंद्र चव्हाण, विद्याधर कोठावळे,जावेद मुजावर, प्रवीण वळवडे, सचिन चौगुले, संजय नांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes