SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद येत्या महिन्याभरात विविध मंत्र्याकडे बैठका लावणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीरइचलकरंजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केन चेस अकॅडमी'तर्फे भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्प उत्साहात अभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत : मेजर अभिजीत ताम्हणकर; केआयटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळाशाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

जाहिरात

 

सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र

schedule17 Aug 26 person by visibility 142 categoryउद्योग

▪️छोट्या दूध संस्थांचा जिद्द आणि चिकाटीचा न्यायालयीन लढा यशस्वी
▪️अदृश्य शक्तीला पुन्हा एकदा मोठी चपराक
                
कोल्हापूर : सहनिबंधक- दुग्ध  कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी २९८ संस्थांचे अपील विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक दुग्ध अधिकारी देविदास मिसाळ यांनी मंजूर केले. त्यामुळे अवसायनात काढलेल्या दूध संस्थेच्या मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. छोट्या दूध संस्थांचा जिद्द आणि चिकाटीचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला. न्यायालयीन लढाईतील या यशामुळे छोट्या दूध संस्थांना अवसायनात काढण्यासाठी खटाटोप करणाऱ्या अदृश्य शक्तीला पुन्हा एकदा मोठी चपराक बसली आहे. 
          
याबाबत अधिक माहिती अशी, विभागीय उपनिबंधक श्री. मिसाळ यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार अपील दाखल केले होते. या अपिलांची सुनावणी पुण्यात शुक्रवारी दि. १४ पार पडली होती व हा निकाल राखीव राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दि. १७  त्याचा निकाल देण्यात आला. सुनावणीअंती सर्व २९८ संस्थांची अपिले मंजूर करण्यात आली. सहाय्यक निबंधक दुग्ध  कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनाचे आदेश बेकायदेशीर ठरवून रद्दबातल करण्यात आले आहेत. नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संस्थांना बाजू मांडण्याची संधी न दिल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले होते.  ते सर्वच निष्कर्ष ग्राह्य धरून श्री. देविदास मिसाळ यांनी हे आदेश पारित केले आहेत.
​          
या निकालामुळे पावसाळ्यात काढलेल्या सर्व संस्थांचा मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला असून संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
​या प्रकरणात संस्थांच्यावतीने अ‍ॅड. प्रबोध पाटील, अ‍ॅड. के. डी. पवार आणि अ‍ॅड. योगेश शहा यांनी बाजू मांडली.
         
▪️ही तर नागराजाची कृपा......!
याबाबत विकास पाटील- कुरूकलीकर म्हणाले, आज नागपंचमीचा सण. बळीराजा आणि नागाराजाचे नाते पिढ्यानपिढ्याचे आहे  या निकालाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालेला हा न्याय, ही जर नागराजाचीच कृपा आहे.... .!

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes