SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजनअनधिकृत नळ कनेक्शन व थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई; शास्त्रीनगरमध्ये ६ कनेक्शन खंडितगुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोलेटाकळी येथे औद्योगिक वसाहतीसह सैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार : नामदार उदय सामंतजागतिक हेलियम दिन: एक वैज्ञानिक पर्व आणि महाराष्ट्राचा अभिमानकोल्हापुरात १ कोटी ९५ लाखांची गोव्यातील अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद

जाहिरात

 

केडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद

schedule17 Aug 26 person by visibility 244 categoryउद्योग

▪️नफा तरतुदीतून  वेतन फरकाचे एकूण ४० कोटी अदा
           
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतनवाढ फरकापोटीचा तिसरा आणि शेवटचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यांवर वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. बँकेकडून वाढीव पगाराच्या फरकापोटीची १२ कोटी, ७७ लाख रुपयांची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर लवकरच वर्ग केली जाणार आहे. यामुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
         
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला होता. मंत्री व बँकेचे अध्यक्ष श्री. हसन  मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत बँक व्यवस्थापन आणि  बँकेत कार्यरत असलेल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह  बँक एम्प्लॉईज युनियन,  बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्ही युनियनमध्ये हा करार झाला होता. एक एप्रिल २०१७ पासून ही पगारवाढ लागू झाली. पगारवाढीसह वेतनवाढीच्या या फरकापोटी मागील ८८ महिन्यांचा एकूण रू. ४० कोटी फरकही बँकेच्या नफ्यातील तरतुदींमधून कर्मचाऱ्यांना देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला होता. 
          
या करारानुसार बँकेने वेतनवाढ फरकापोटीच्या पहिल्या हप्त्याची रु. १५ कोटी, १३ लाख एवढी रक्कम दि. २५ ऑक्टोबर २०२४  रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली होती.  दुसऱ्या हप्त्याची रू. १२ कोटी, ७७ लाख एवढी रक्कम दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी वर्ग केली होती. वेतनवाढ फरकापोटीची उर्वरित तिसऱ्या आणि शेवटच्या हप्त्याची रू. १२ कोटी, ७७ लाख आहे.
               
बँकेचे अध्यक्ष व मंत्री  मुश्रीफ म्हणाले, गणेश चतुर्थीच्या सनापूर्वी वेतनवाढ फरकापोटीच्या तिस-या म्हणजेच शेवटच्या हप्त्याचीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ शकलो, याचे आम्हा सर्व संचालक मंडळाला समाधान आणि आनंद आहे. बँकेने अतिशय चांगली प्रगती केली आहे.  बँक ज्या परिस्थितीतून गेली त्यावर मात करण्याची शक्ती शेतकऱ्यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटावे. विशेषता; ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून देऊन काम करावे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes