नगरोत्थानच्या रस्त्यावर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसांची मुदत
schedule20 May 24 person by visibility 404 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जंयती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत चार रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये सुरु असलेल्या कामापैकी न केलेल्या रस्त्याच्या उर्वरीत भागावर जर कोणाला पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. यामध्ये संबंधीतांनी महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधुन रितसर मंजुरी घेऊन पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन टाकणेची कार्यवाही करण्यात यावी.
रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही याची सर्व संबंधीत नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
यामध्ये दसरा चौक ते बिंदु चौक ते खासबाग ते मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक इंदिर सागर हॉटेल चौक, प्रभाग क्र.69 समाधान हॉटेल ते आय.टी.आय.कॉर्नर, सुभाष रोड (‘60’ वाईड डी.पी) ते भोसले हॉस्पीटल, राजारामपुरी माऊली चौक ते हुतात्मा चौक ते गोखले कॉलेज चौक कन्हैया सर्विसिंग सेंटर ते विश्वजित हॉटेल, प्र.क्र.47 खरी कॉर्नर चौक ते गांधी मैदान चौक ते निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक इत्यादी भागाचा समावेश आहे.