SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण; आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली कामाची पाहणीआधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यशकोल्हापूरच्या मैदानातून उमटणार आंतरराष्ट्रीय डंका; स्टेडियमसाठी सामंजस्य करार फत्ते!येत्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियानाचे आयोजनपावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; आंतरराज्य समन्वयावर भरकोल्हापूर मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा उत्साहात; महाराष्ट्र हायस्कूल, उषाराजे हायस्कूल ठरले विजेते!वारणा दूध संघाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात कोल्हापूर महापालिका : भंगारात निघालेल्या आणखीन दोन आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

वारणा दूध संघाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात

schedule21 Jul 26 person by visibility 250 categoryराज्य

▪️​‘प्रेग्नन्सी पशुखाद्य’ या नवीन उत्पादनाचा शुभारंभ; ७७० रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान
​वारणानगर : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा (वारणा दूध संघ) ५८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दूध संघातर्फे पशुपालकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या ‘प्रेग्नन्सी पशुखाद्य’ या नवीन उत्पादनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ७७० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

​ ▪️पशुपालकांसाठी नवे वरदान: ‘प्रेग्नन्सी पशुखाद्य’
वारणाने आपला प्रत्येक उत्पादनातील दर्जा व गुणवत्ता अबाधित राखला आहे.​दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनातील नाविन्यते बरोबरच दुभत्या जनावरांच्या आरोग्याची आणि गर्भावस्थेतील पोषणाची गरज ओळखून वारणा दूध संघाने सातत्याने नवनवीन प्रयोग केले आहेत. याच साखळीत आता ‘प्रेग्नन्सी पशुखाद्य’ या विशेष खाद्याची भर पडली आहे. गाभण जनावरांच्या चयापचय क्रिया, हार्मोनल बदल, गर्भाची वाढ इ. पूर्ण करण्यासाठी उत्तम आहार,जनावर विल्यानंतर दूध उत्पादन सुधारते व कासेचे आरोग्य सुधारते.वार पूर्ण न पडणे, 'मिल्क फिव्हर' कासेचा दाह, 'किटोसिस' यासारखे आजार टाळण्यासाठी उपयुक्त,उच्च दर्जाची प्रथिने, उर्जा, खनिजे, जीवनसत्वे व इतर आवश्यक पूरक घटकांचा समतोल वापर,गर्भवाढ, दुधाचे उत्पादन वाढवण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
​या नाविन्यपूर्ण उत्पादनामुळे वारणा ब्रँडने पशुखाद्य क्षेत्रात आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

पशुखाद्याचे नूतन नियुक्त पशुखाद्य डीलर यांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.नवीन आकर्षक व मजबूत पॅकिंगमध्ये पशुखाद्याचे अनावरण करण्यात आले.​नूतन कॉन्फरन्स रूमचेही उदघाटनही यावेळी करण्यात आले. वर्धापन दिनाचे औचित्य केवळ औपचारिक समारंभापुरते मर्यादित न ठेवता, संघाने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वारणा परिसरातील तरुण, दूध उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल ७७० रक्तदात्यांनी रक्तदान करून हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने 'रुग्णसेवेचा दिवस' म्हणून सार्थ ठरवला.महात्मा गांधी हॉस्पिटल नवे पारगाव यांनी रक्त संकलित केले.

🔵 ​"वारणा दूध संघाने नेहमीच शेतकरी आणि पशुपालकांचे हित केंद्रस्थानी ठेवले आहे. आज विक्री शुभारंभ करण्यात आलेले नवीन प्रेग्नन्सी पशुखाद्य जनावरांची क्षमता आणि दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. तसेच, ७७० जणांनी केलेले रक्तदान हे वारणा परिवाराच्या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेचे प्रतीक आहे."
— आमदार डॉ. विनय कोरे

​ ◼️सकाळी मुख्य दुग्धालयात संघाचे अध्यक्ष एच. आर.जाधव  यांचे हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली.या सोहळ्याला संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. एन. आर. पाटील,कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर,संघाचे संचालक मंडळ,वारणा उद्योग समूहातील पदस्थ मान्यवर, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ५८ वर्षांची दैदिप्यमान परंपरा सांगणारा हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes